कर्मधर्मसंयोग

– महेंद्र कानिटकर

कर्मधर्मसंयोग हा शब्द वापरला जातो ’सुदैवाने’, ’लकिली’, अशा अर्थाने!… ’नशिबाने त्यावेळी मी तिथे होतो’ असे म्हणताना हा शब्द मनात आणि वाणीमध्ये येतो. परंतु विवेकनिष्ठ कर्म आणि विश्वप्रेमावर आधारित धर्म हयांचा संगम होणे ही विकासाची उच्च आणि अप्रतिम अवस्था आहे, अशा अर्थाने हयाच शब्दाकडे पाहता येते… असे झाल्यावर रुजतो तो सत्त्वगुण! जीवनविकास नेमके कशाला म्हणायचे? भौतिक सुखांचा उतरंडीला, मान्यता आणि प्रतिष्ठेच्या मापदंडांना, की अखंड सत्तास्थानाच्या प्राप्तीला?… हया सा-या व्याख्यांना ’सत्त्वगुणा’चा स्पर्श झाल्याशिवाय खरा जीवनविकास साधणार नाही, असे मानसशास्त्र आणि प्राचीन परंपरा हया दोन्ही ज्ञानशाखा सांगतात. दैनंदिन व्यवहारी आयुष्यामध्ये धर्म, देव, कर्मकांडे, दैव हया विषयांवरचे अनेक प्रश्न तुमच्या-आमच्या समोर असतात. जीवनविकासाच्या दॄष्टिकोनातून त्याकडे कसे पाहता येईल, हयाचा विचार हया पुस्तकात केला आहे. व्यक्तिमत्त्व विकासाकडून कडे जाणारी पाश्चात्त्य मानसशास्त्रीय संकल्पना आणि जीवनविकासाला आध्यात्मिक चौकटीत बसवणारी पौर्वात्य संकल्पना हयांच्या हा संगम आहे, एकविसाव्या शतकातील जिज्ञासू मनांसाठी!