आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्यं दडलेली आहेत!
पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते? मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षं टिकू शकणारा मध तयार होतो? कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते? आश्चर्यंच आश्चर्यं! आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच.
