नितीन देऊसकर

मी नितीन देऊसकर
एका सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म, पालन पोषण झाले. माझे वडील सरकारी नोकर होते आणि अतिशय इमान इतबारे त्यांनी आपली नोकरी पार पाडली आणि जबाबदारी पार पाडली आणि मला चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार दोन्ही गोष्टी दिल्या मी एम ए झालो मी law ची परीक्षा देखील पास झालो.मी याच काळात psi परीक्षा देखील उत्तीर्ण झालो, पण पुढे जाऊ शकलो नाही. निराशझालो आणि याच काळामध्ये मी व्यसनात सुद्धा गुंतलो. म्हणजेच दारूच्या आणि जुगाराच्या मला कळलेच नाही मी त्याच्या आधीन केव्हा झालो आर्थिक नुकसान तर मी करत गेलोच कारण माझ्याकडे फारसा पैसा नसताना देखील जुगारासारखे व्यसन मला परवडणारे नव्हते नशिबाने मी फार उतमात केला असे म्हणता येणार नाही पण माझ्या व्यसनाच्या शेवटच्या पाच सहा वर्षांच्या काळात माझे वडील अगदी थकून गेले होते 1997 साली त्यांना एक मार्ग मिळाला तो म्हणजे मुक्तांगण चा. मला ते घेऊन आले पण त्यावर एक महिन्यामध्ये माझ्यात काही फारसा बदल झाला नाही मी परत बाहेर पडलो आणि काही काळातच पुन्हा माझी दोन्ही व्यसने सुरू झाली आणि पुन्हा काही त्या मुक्तांगणला जायचे नाही असा निर्धार करून व्यसन मात्र जोरात सुरू झाले. वडील खूपच थकले होते त्यांना काय करायचे कळत नव्हते अशाच हतबल परिस्थितीत अनिल अवचट म्हणजे बाबा आमच्या गावी कोल्हापुरात आले होते .तेव्हा आमचे वडील त्यांना भेटले तेव्हा बाबांनी सांगितले तो निराश झालाय तुम्ही निराश होऊ नका त्याला घेऊन या मुक्तांगण ला आणि मी आलो पुन्हा मुक्तांगणला. राहिलो मुक्तांगण मध्येच अर्थात हे सगळं शक्य झालं ते बाबा आणि मुक्ता ताई या दोघांमुळे गेले 26 वर्ष मी मुक्तांगण मध्ये काम करत आहे. माझे वडील जे पूर्णपणे हातबल झाले होते आई जी कंटाळून गेली होती ती गेले 25 वर्षे दोघेजण वृद्धापकाळ असून देखील छान जीवन जगले आणि मग मागच्या महिन्यात दोघा ंचेही देहावसन झाले. ते समाधानाने गेले मुक्तांगण परिवाराच्या हाती मला सोपवून. मुक्तांगण नसतं तर आज मी नसतो आणि मी आहे म्हणून मुक्तांगण विषयी कृतज्ञता ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी पुढे पुढे पोहोचवत राहणार.