Sept. – Oct. 2021. दिवाळी अंक.
Author: Team Muktangan

कुतूहलापोटी
आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्यं दडलेली आहेत!
पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते? मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षं टिकू शकणारा मध तयार होतो? कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते? आश्चर्यंच आश्चर्यं! आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच.

स्वभाव – विभाव
माणूस म्हणून जगताना, दारात येणार्या दिवसाची, जुनी-नवी आव्हाने पेलताना… नात्यागोत्यांच्या कल्लोळात, स्वतःशी नातं शोधताना… जबाबदार्याच्या जंजाळात, थकला श्र्वास घेताना… मनावर हवा ताजा शिडकावा, विवेकनिष्ठ विचारांचा.
विचार-भावना-वर्तन या `विभाव’त्रयीतून बनणार्या स्वभावाच्या संगती-विसंगती तसेच मर्मस्थाने, सौंदर्यस्थळे यांचा मनोज्ञ प्रवास…

लाकूड कोरताना
माझा स्वभाव नादिष्टच. अनेक गोष्टी करून पहायचा नाद. त्यात लाकूड हाती लागलं आणि कोरत बसलो, ते आजपावेतो. हत्यार कसं धरायचं तेही सुरुवातीला माहीत नव्हतं. त्यामुळे भरपूर चुका केल्या. हाताला, मांडीला जखमा झाल्या. कधी हत्याराला हातोडीचा ठोका जरा जोरात बसला; लाकूड चिरफाळत गेलं. केलेलं काम वाया गेलं. पण त्यातून लाकडाचा स्वभाव कळला. आपलं आपण शिकत गेलो. हळूहळू लाकडातून शिल्पं आकारत गेली. तुम्हाला सांगतो, शिल्प पुरं झाल्यावर काय बरं वाटतं! शिखरावर पोहचल्यावर थकवा घालवणारा वाऱ्याचा थंडगार झोत यावा तसं.

मनोगती
मनोगती… म्हणजे मनाची गती… क्षणामध्ये आठवणींचे खंड पार करणारी… भविष्यातल्या भरार्या मारणारी… कधी वर्तमानाच्या आडोशाला बसणारी… वर कधी स्वतःमध्येच गिरक्या घेणारी. मनोगत म्हणजे मनातले विचार… आपल्या भावना आणि वर्तनाला आकार देणारे विचार. कधी विवेकाने वागणारे, तर कधी विनाशाकडे धावणारे… मनोगती म्हणजे मनोगतामध्ये, आत जाऊन घेतलेला वेध! विकाराकडून विकासाकडे नेणारा… आधुनिक मानसशास्त्र, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, तसेच महाराष्ट्राचा भागवत्धर्म ह्यांचा समन्वय साधणारा वैयक्तिक आणि सामाजिक मनोस्वास्थ्याचा उपयुक्त आलेख. अनुभवी मनोविकासतज्ज्ञाच्या अनुभवांचे आणि प्रत्यक्ष संवादसत्रांचे प्रभावी रेखाटन… मनोगती.

शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट
Renowned psychiatrist, Dr. Anand Nadkarni setup IPH-Institute for Psychological Health 20 years ago. This book talks about the efforts taken by this institute to increase awareness about psychological illness among people, curing those affected and enabling them to hold their own against the stress and strain of daily life. This institute makes use of innovative methods like Literature, Music, Drama, Art and Interaction along with age-old methods like clinical cures and counselling. This book also gives useful insights to common readers.

मुक्तीपत्रे
व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेला रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातला हा उद्बोधक पत्रव्यवहार आहे. व्यसनाधीनतेतून बाहेर पडण्याची नेमकी दिशा हा पत्रव्यवहार दाखवतो. व्यसनात अडकलेल्या माणसाच्या कौटुंबिक जीवनाचे नाजूक पैलूही त्यातून उलगडतात. आरोग्यविषयक प्रश्नावर पत्रशैलीने लिहिलेलं असं पुस्तक मराठीत दुसरं नाही. दारू पिणारे आणि न पिणारे या दोघांनीही हे पुस्तक वाचायलाच हवं. कारण निरोगी जगण्याचा कानमंत्र त्यात आहे.

कार्यरत
अनिल अवचट यांचे `कार्यरत’ हे सोळावे पुस्तक. कार्यहीनता, भ्रष्टाचार, अविवेकी राजकारण यांनी काळोखलेल्या वातावरणात हे काही आशेचे किरण. या पुस्तकातील माणसे समाजातल्या प्रश्र्नांवर सर्वस्व झोकून देऊन काम करणारी. प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून समाजासाठी वेगळ्या वाटा शोधणारी. आदिवासींमधे काम करणारी सुरेखा दळवी, विंचूदंशावर इलाज शोधणारे बावस्कर, तुंगभद्रा नदीच्या पर्यावरणाच्या नाशाविरुद्ध लढणारे हिरेमठ, दुष्काळी भागात प्रतिसृष्टी निर्माण करणारे अरुण देशपांडे आणि काका चव्हाण, आणि गडचिरोलीतील आदिवासींमधल्या आरोग्याच्या प्रश्र्नांवर उत्तर शोधणारे अभय व राणी बंग, यांच्या कामाकडे, चारित्र्याकडे पाहिलं तर जगायची नवी उभारी येते. सर्वच काही संपलं नाही, याची ग्वाही, या पुस्तकातली माणसं पानापानावर, वाक्यावाक्यात देत राहतात.

कर्मधर्मसंयोग
कर्मधर्मसंयोग हा शब्द वापरला जातो ’सुदैवाने’, ’लकिली’, अशा अर्थाने!… ’नशिबाने त्यावेळी मी तिथे होतो’ असे म्हणताना हा शब्द मनात आणि वाणीमध्ये येतो. परंतु विवेकनिष्ठ कर्म आणि विश्वप्रेमावर आधारित धर्म हयांचा संगम होणे ही विकासाची उच्च आणि अप्रतिम अवस्था आहे, अशा अर्थाने हयाच शब्दाकडे पाहता येते… असे झाल्यावर रुजतो तो सत्त्वगुण! जीवनविकास नेमके कशाला म्हणायचे? भौतिक सुखांचा उतरंडीला, मान्यता आणि प्रतिष्ठेच्या मापदंडांना, की अखंड सत्तास्थानाच्या प्राप्तीला?… हया सा-या व्याख्यांना ’सत्त्वगुणा’चा स्पर्श झाल्याशिवाय खरा जीवनविकास साधणार नाही, असे मानसशास्त्र आणि प्राचीन परंपरा हया दोन्ही ज्ञानशाखा सांगतात. दैनंदिन व्यवहारी आयुष्यामध्ये धर्म, देव, कर्मकांडे, दैव हया विषयांवरचे अनेक प्रश्न तुमच्या-आमच्या समोर असतात. जीवनविकासाच्या दॄष्टिकोनातून त्याकडे कसे पाहता येईल, हयाचा विचार हया पुस्तकात केला आहे. व्यक्तिमत्त्व विकासाकडून कडे जाणारी पाश्चात्त्य मानसशास्त्रीय संकल्पना आणि जीवनविकासाला आध्यात्मिक चौकटीत बसवणारी पौर्वात्य संकल्पना हयांच्या हा संगम आहे, एकविसाव्या शतकातील जिज्ञासू मनांसाठी!