
Category: Publications
Anandyatri Sept. – Oct. 2021
Sept. – Oct. 2021. दिवाळी अंक.
कुतूहलापोटी
आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्यं दडलेली आहेत!
पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते? मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षं टिकू शकणारा मध तयार होतो? कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते? आश्चर्यंच आश्चर्यं! आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच.
स्वभाव – विभाव
माणूस म्हणून जगताना, दारात येणार्या दिवसाची, जुनी-नवी आव्हाने पेलताना… नात्यागोत्यांच्या कल्लोळात, स्वतःशी नातं शोधताना… जबाबदार्याच्या जंजाळात, थकला श्र्वास घेताना… मनावर हवा ताजा शिडकावा, विवेकनिष्ठ विचारांचा.
विचार-भावना-वर्तन या `विभाव’त्रयीतून बनणार्या स्वभावाच्या संगती-विसंगती तसेच मर्मस्थाने, सौंदर्यस्थळे यांचा मनोज्ञ प्रवास…
लाकूड कोरताना
माझा स्वभाव नादिष्टच. अनेक गोष्टी करून पहायचा नाद. त्यात लाकूड हाती लागलं आणि कोरत बसलो, ते आजपावेतो. हत्यार कसं धरायचं तेही सुरुवातीला माहीत नव्हतं. त्यामुळे भरपूर चुका केल्या. हाताला, मांडीला जखमा झाल्या. कधी हत्याराला हातोडीचा ठोका जरा जोरात बसला; लाकूड चिरफाळत गेलं. केलेलं काम वाया गेलं. पण त्यातून लाकडाचा स्वभाव कळला. आपलं आपण शिकत गेलो. हळूहळू लाकडातून शिल्पं आकारत गेली. तुम्हाला सांगतो, शिल्प पुरं झाल्यावर काय बरं वाटतं! शिखरावर पोहचल्यावर थकवा घालवणारा वाऱ्याचा थंडगार झोत यावा तसं.




