‘मुक्तांगण’ला देणगी देतेवेळी पु. ल. म्हणाले होते, ‘एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन.’
पु. ल. तसे माझे वडीलच. त्यांचे अनुकरण करून म्हणावेसे वाटते, की हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणार्या एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसेल तर सार्थक झाले समजेन.
