माणसं

हमाल, भंगी, वेश्या, ऊसतोडणी कामगार, धार्मिक भोंदूगिरी अशा कितीतरी विषयांची त्यांनी त्यांच्या नजरेनं केलेली पाहणी आणि त्यातून त्यांनी उभं केलेलं लेखन, हे मराठी साहित्यातले एक महत्त्वपूर्ण काम आहे. विशेषतः त्यांचं ‘माणसं’ हे पुस्तक या अर्थाने मराठी साहित्यातील मैलाचा दगड आहे. ‘माणसं’पूर्वी अशा प्रकारचं लेखन मराठीत नव्हतं असं नाही, पण अवचटांनी वृत्तांतकथन म्हणजे रिपोर्ताजच्या साहाय्याने वाचकाला जे काही दाखविलं, ते एकदमच नावीन्यपूर्ण होतं. ‘माणसं’ मधल्या दीर्घलेखांमध्ये पत्रकाराची वास्तव टिपणारी नजर आहे, पण त्यामध्ये एखाद्या कादंबरीकारासारखे तपशील येतात.

Read More

प्रश्न आणि प्रश्न

समाजाशी निगडित घडामोडींचा सखोल ऊहापोह करणारे आठ लेख ‘प्रश्र्न आणि प्रश्र्न…’मध्ये समाविष्ट आहेत : ‘पाणी आणि माती’, ‘पठार आणि खाणी’ या लेखांतून, त्यांचे जीवनातील स्थान, त्यांची जपणूक आणि उपयोजन यांचा विचार होतो… मध्यप्रदेशातील बस्तर भागातल्या जंगलाची बेबंद तोड ‘बस्तरचे अरण्यरुदन’मध्ये चित्रित होते. भारतातला मत्स्यव्यवसाय, त्यातल्या व्यावसायिकांचे प्रश्र्न, जागतिकीकरणाचे परिणाम यांचे विवेचन अनिल अवचट ‘मच्छिमार आणि समुद्र’मध्ये करतात….

Read More