नितीन देऊसकर

मी नितीन देऊसकरएका सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म, पालन पोषण झाले. माझे वडील सरकारी नोकर होते आणि अतिशय इमान इतबारे त्यांनी आपली नोकरी पार पाडली आणि जबाबदारी पार पाडली आणि मला चांगले शिक्षण आणि चांगले संस्कार दोन्ही गोष्टी दिल्या मी एम ए झालो मी law ची परीक्षा देखील पास झालो.मी याच काळात psi परीक्षा देखील उत्तीर्ण […]

Read More

कुतूहलापोटी

आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजीवात किती आश्चर्यं दडलेली आहेत!
पक्ष्यांच्या मऊसूत हलक्या पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते? मधमाशा मकरंदावर अशी कोणती प्रक्रिया करतात, ज्यातून हजारो वर्षं टिकू शकणारा मध तयार होतो? कुण्या एका कीटकाची अंडी वीस-वीस वर्षं सुप्तावस्थेत कशी काय राहू शकतात? माणसाला अजूनही न जमलेलं सेल्युलोजचं विघटन बुरशी कसं करते? आश्चर्यंच आश्चर्यं! आपल्या शरीराचंही तेच. मेंदूपासून हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात, हे एक कोडंच.

Read More

स्वभाव – विभाव

माणूस म्हणून जगताना, दारात येणार्‍या दिवसाची, जुनी-नवी आव्हाने पेलताना… नात्यागोत्यांच्या कल्लोळात, स्वतःशी नातं शोधताना… जबाबदार्‍याच्या जंजाळात, थकला श्र्वास घेताना… मनावर हवा ताजा शिडकावा, विवेकनिष्ठ विचारांचा.

विचार-भावना-वर्तन या `विभाव’त्रयीतून बनणार्‍या स्वभावाच्या संगती-विसंगती तसेच मर्मस्थाने, सौंदर्यस्थळे यांचा मनोज्ञ प्रवास…

Read More

लाकूड कोरताना

माझा स्वभाव नादिष्टच. अनेक गोष्टी करून पहायचा नाद. त्यात लाकूड हाती लागलं आणि कोरत बसलो, ते आजपावेतो. हत्यार कसं धरायचं तेही सुरुवातीला माहीत नव्हतं. त्यामुळे भरपूर चुका केल्या. हाताला, मांडीला जखमा झाल्या. कधी हत्याराला हातोडीचा ठोका जरा जोरात बसला; लाकूड चिरफाळत गेलं. केलेलं काम वाया गेलं. पण त्यातून लाकडाचा स्वभाव कळला. आपलं आपण शिकत गेलो. हळूहळू लाकडातून शिल्पं आकारत गेली. तुम्हाला सांगतो, शिल्प पुरं झाल्यावर काय बरं वाटतं! शिखरावर पोहचल्यावर थकवा घालवणारा वाऱ्याचा थंडगार झोत यावा तसं.

Read More

मनोगती

मनोगती… म्हणजे मनाची गती… क्षणामध्ये आठवणींचे खंड पार करणारी… भविष्यातल्या भरार्या मारणारी… कधी वर्तमानाच्या आडोशाला बसणारी… वर कधी स्वतःमध्येच गिरक्या घेणारी. मनोगत म्हणजे मनातले विचार… आपल्या भावना आणि वर्तनाला आकार देणारे विचार. कधी विवेकाने वागणारे, तर कधी विनाशाकडे धावणारे… मनोगती म्हणजे मनोगतामध्ये, आत जाऊन घेतलेला वेध! विकाराकडून विकासाकडे नेणारा… आधुनिक मानसशास्त्र, प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, तसेच महाराष्ट्राचा भागवत्धर्म ह्यांचा समन्वय साधणारा वैयक्तिक आणि सामाजिक मनोस्वास्थ्याचा उपयुक्त आलेख. अनुभवी मनोविकासतज्ज्ञाच्या अनुभवांचे आणि प्रत्यक्ष संवादसत्रांचे प्रभावी रेखाटन… मनोगती.

Read More

शहाण्यांचा सायकिॲट्रिस्ट

Renowned psychiatrist, Dr. Anand Nadkarni setup IPH-Institute for Psychological Health 20 years ago. This book talks about the efforts taken by this institute to increase awareness about psychological illness among people, curing those affected and enabling them to hold their own against the stress and strain of daily life. This institute makes use of innovative methods like Literature, Music, Drama, Art and Interaction along with age-old methods like clinical cures and counselling. This book also gives useful insights to common readers.

Read More